
आमगाव,दि.१६ : तालुक्यातील रिसामा गावात नवीन वसाहतीच निर्माण होत असतााना कॉलोनीमध्ये आगमनाकरीता कच्चे रस्ते असल्यामुळे नागरिकाना त्रास होत असते.त्यामुळे या परिसरात रस्ता बांधकामाची मागणी खासदार प्रफुल पटेल व माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्याकडे करण्यात आली होती.त्या मागणीकडे लक्ष देत नागरी सेवा सुविधे अंतर्गत 10 लक्ष मंजूर करुन सदर रस्ता खड़िकरणाचे काम जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या हस्ते भूमिपूजन करुन करण्यात आले.यावेळी बाजार समितीचे माजी सभापती टिकाराम मेंढे,आमगाव राकाँपा अध्यक्ष कमलबापू बहेकार,रवि क्षिरसागर,राजेश भक्तवर्ती,रमन डेकाटे,प्रमोद शिवनकर,अनिल शर्मा, सुभाष येवलकर, धनीराम बिसेन, संतोष श्रीखंडे, पियुष झा, गुड्डू मेंढे, ऋषि शर्मा ,रिसामा येथील हिरासिंह कनपुरिया सुरेश डोंगरे, पंचाराम मडावी, दिनेश वलथरे, भुते, दिलीप चंदेल, अशोक वर्गणंटवार, टुंडीलाल गौतम, टेकचंद कटरे, मनिषा कनपुरिया, डोंगरे व समस्त इतर उपस्थित होते.