36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ जबलपूर-रायपूर तसेच इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा सालेकसा येथे देण्यात यावे

जबलपूर-रायपूर तसेच इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा सालेकसा येथे देण्यात यावे

0
59

blank

सालेकसा,दि.१६ :रेल्वे मंत्रालयाने नुकतीच जाहीर केलेली जबलपूर रायपूर इंटंरसिटी एक्सप्रेससह इतवारी बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेगाडीचा थांबा सालेकसा रेल्वेस्थानकात देण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस सालेकसा तालुक्याच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांना देण्यात आले.

निवेदनात सालेकसा रेल्वे स्थानकावर ट्रेन क्रमांक 12855/12856 इतवारी बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस व नवीन घोषणा करण्यात आलेली जबलपूर रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा देण्यात यावे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ अजय उमाटे, शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, युवक तालुका अध्यक्ष बाजीराव तरोने, संतोष नागपुरे, संदीप मिश्रा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.आले यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन,आमदार इंजि.राजकुमार बडोले उपस्थित होते.खासदार पटेल यांनी शिष्टमंडळाला दोन्ही गाड्यांचे थांबे सालेकसा रेल्वेस्थानकावर मिळावे याकरीता रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

blank