36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय ‘मेल्यावर साहेबांना काय सांगू?’; ‘या’ शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

‘मेल्यावर साहेबांना काय सांगू?’; ‘या’ शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

0
105

blank

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेच्या वापराला दिवाकर रावतेंनी विरोध केला.

मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणं चुकीचं आहे, सभागृहात कामकाज सुरु असताना इंग्रजी भाषेचा वापर होतोय, हा प्रकार हास्यास्पद आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकही शब्द व्यक्त करण्यात आला नाही, असंही रावते म्हणाले.

मुंबईतील बॉम्बे क्लबचे नाव आजही तेच आहे बदललं जात नाही, मुंबईत सर्व भाषा आणि परप्रांतीयांचे भवन बांधले जातात मराठी भवन का नाही? शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चरता आला नाही हे दुर्दैव, असं म्हणत रावतेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

संभाजीनगर बोलायचं नाही कारण हे किमान समान कार्यक्रमात नाही, मराठीबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही हे मला बोलावं लागतंय, मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र तरीही मराठीसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही, मी मेल्यावर साहेबांना भेटलो तर मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ?, असा सवाल दिवाकर रावतेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

blank