38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश ‘विको’चे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे निधन

‘विको’चे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे निधन

0
28

blank

मुंबई, दि. ८ – ‘विको’ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. मराठी उद्योगक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणा-या पेंढरकर यांनी वयाच्या ८२व्या वर्षी परळमधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या पेंढरकर यांना काही दिवसांपूर्वी उपचारांसाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते, मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पेंढरकर यांच्यासारख्या प्रयोगशील उद्योगपतीच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात हळळहळ व्यक्त होत आहे.

blank