इंटरनेटवर तरुणींचा सौदा, फ्लॅटवर देहविक्री

0
19

नागपूर दि. ८ – येथील झिंगाबाई टाकळी परिसरातील विषपा अपार्टमेंटच्‍या तिसऱ्या मजल्‍यावरील एका प्‍लॅटमध्‍ये सुरू असलेल्‍या हायप्रोफइल सेक्‍स रॅकेचा पोलिसांनी भांडाफोड केला. यात बंगालच्‍या दोन मुलींची मुक्‍तता करण्‍यात आली असून, दोघांना अटक करण्‍यात आली आहे. दरम्‍यान, दोघे फरार होण्‍यास यशस्‍वी ठरलेत.
पोलिसांनी सांगितले की, हा देहविक्रीचा व्‍यवहाय इंरटनेटच्‍या माध्‍यमातून चालवला जात होता. नेटवरून नोंदणी होताच आरोपी जॉन ऊर्फ लारेंस डेविड डिसूजा (40) आणि मोहम्मद सद्दाम मोहम्मद अब्दुला हे तरुणींना कारमधून ग्राहकांपर्यंत सोडत असत. हे रॅकेट कोलकाता, मुंबई, भोपाळ आणि हैदराबादपर्यंत पोहोचलेले होते.
या ठिकाणी हायप्रोपाइल सेक्‍स रॅकेट चालत असल्‍याची गुप्‍त माहिती स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे बाजीराव पवार यांना मिळाली. त्‍यांनी या बाबत आपल्‍या वरिष्‍ठांना सांगितले. नंतर छापा टाकण्‍याची योजना आखली. पोलिसांनी आपल्‍या एका कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्‍हणून दलाल जॉन उर्फ लारेंस डिसूजा आणि मोहम्मद सद्दाम यांच्‍याकडे पाठवले. त्‍या दोघांनी साहिल उर्फ पापा आणि राज पलांदुरकर यांच्‍यासोबत संपर्क केला. हे दोघे इतर राज्‍यातील सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तरुणींच्‍या संपर्कात आहेत. या बनावट ग्राहकाकडे डिसुजा आणि सद्दाम यांनी आठ हजार रुपयांची मागणी केली. नंतर 3 हजार रुपयांत व्‍यवहार ठरला. पुढे त्‍यांनी कोलकत्‍त्‍यावरून मुलीला नागपूर येथे बोलावण्‍यात आले. ही मुलगी 10 दिवसांच्‍या करारावर ट्रेनने नागपूरला आली. जॉन आणि मोहम्मद सद्दाम तिला फ्लॅटमध्‍ये घेऊन गेले. तिथे बनावट ग्राहकाला त्‍यांनी बोलावले. नंतर पोलिसांनी छापा टाकून आरोपीला अटक केली. या प्रकरणी मानकापूर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.