३३ औष्ठव्यंगांची शस्त्रक्रियेसाठी निवड

0
13

गोंदिया,दि. ८ -येथील युवा जागृती संस्थेच्यावतीने नुकतेच घेण्यात आलेल्या शस्त्रक्रिया तपासणी शिबिरात ३३ औष्ठव्यंगांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
शिबिराचे उद्घाटन पांढर रूग्णालयाचे (बैतुल) वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव चौधरी व डॉ. दीपा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ५९ बाळ, महिला व पुरूषांची तपासणी पांढर रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव चौधरी यांनी केली. यातील ३३ औष्ठव्यंगांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. शिबिरासाठी संस्थाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव नरेश अग्रवाल, प्रा. मेहबूब हिरानी, अजय अग्रवाल, सोनू सावंत, प्रकाश तिडके, जितेंद्र घरडे, अमीत हेमणे आqदनी सहकार्य केले.