
मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आता राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुलाबराव पाटील यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती, असं ट्विट गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.





