
गोंदिया,दि.19ः- कोरोना विषाणूवर विजय मिळविणे सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. ग्रामीण व शहरी भागातील जनतेने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी स्वतः सावधगिरी बाळगली पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक आहे. सुरक्षित अंतर ठेवून गर्दी टाळावी. कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक सरकारच्यावतीने जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीडशील्ड लस उपलब्ध झाली आहे. मनात कोणतीही भीती व शंका न बाळगता लस घेण्यासाठी तत्परतेने पुढे येवून लसीकरण करावे, असे आवाहन शिवसेना गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी केले आहे.शिवहरे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात कोवीडशील्ड लस घेतली,त्यानंतर ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनिल लांजेवार,वैदयकीय अधिकारी डाॅ.सुर्वणा हुबेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.





