
कोल्हापूर : केंद्र सरकार जाणूनबुजून महाराष्ट्राला लसीचा कमी पुरवठा करत आहे असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दसरा चौकात मूक निदर्शने केली. लस वितरणात दुजाभाव करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार केला. कोरोना महामारीच्या कालावधीत भाजपने गलिच्छ राजकारण करू नये, महाराष्ट्राला आज जादा लशींची आवश्यकता असताना केंद्र सरकार मात्र कमी पुरवठा करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, मंजित माने आदींचा समावेश होता.





