
गोंदिया,दि.11: गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज 745 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.तर 167 रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली.आज 14 रुग्णाचा मृत्यू झाला.यामध्ये सर्वाधिक मृत्यू गोंदिया तालुक्यातील 10 असून सर्वच रुग्णांचा मृत्यू हा शासकीय रुग्णालयात झालेला आहे.शासकीय रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूचे प्रमाण हे सर्वाधिक दिसून येत आहे. तर आजपर्यंत 20816 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 16067 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4520 आहे. 3285 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 229 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 85.79 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.1 टक्के आहे तर डब्लिंग रेट 180 दिवस आहे.गोंदिया तालुक्यात आजपर्यंत सर्वाधिक 131 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.तर इतर राज्यातील 10 मृत्यूंचा समावेश आहे.





