
भंडारा, दि.15 :- अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक हे 16 एप्रिल 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
16 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून वाहनाने भंडाराकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता भंडारा येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे कोविड 19 परिस्थिती संदर्भात जिल्हाधिकारी व अन्य सबंधित अधिकारी यांच्या सोबत चर्चा. दुपारी 3.30 वाजता शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.





