34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ साहेब! शिधापत्रिका असूनही रेशन मिळत नाही, जरा त्यांचे ही बघा।

साहेब! शिधापत्रिका असूनही रेशन मिळत नाही, जरा त्यांचे ही बघा।

0
80

blank

कोरोना संक्रमण काळात रेशन न मिळल्याने होते उपासमार

देवरी,दि.21- रेशनचा काळाबाजार करणाऱे स्वस्त धान्यदुकानदार आणि त्यांची पाठराखण करणारे पुरवठा विभागातील अधिकारी यांची काळउघाळणी करणारे आदेश देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी नुकतेच दिले. परिणामी, गेल्या काही वर्षापासून रेशनकॉर्ड असूनही धान्य मिळत नसल्याने कोरोना संक्रमण काळात पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांची वेठबिगारी करावी लागणाऱ्या गोरगरीबांनी साहेब आमच्या पोटाची भूक भागविण्याची सोय करा, आपल्याला पुण्य लाभेल, अशी आर्त हाक तालुका प्रशासनाला दिली आहे.

देवरी तालुका हा तसा अतिमागास, दुर्गम आणि नक्षलप्रभावीत तालुका आहे. या तालुक्यातील जनतेची होणारी पिळवणुक ही काही नवीन बाब नाही. येथील भाबडी जनता मायबाप प्रशासन जे म्हणेल, जे सांगेल त्यालाच सर्वस्व माननारी आहे. तक्रार करूनही काही साध्य होत नसल्याने आपल्या दैवाला दोष देण्यापलिकडे जनतेच्या हातात काहीच नसते, अशी जनभावना या तालुक्यातील नागरिकांची बनली आहे. यातही कळस म्हणजे येथील राजकारण्यांना सुद्धा स्वहिताशिवाय काहीही देणेघेणे नसल्याचे नागरिकांचे नेहमीचेच गाऱ्हाणे आहे.

अशा परिस्थितीमध्ये देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराना सार्वजनिक वितरण प्रणाली व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या. यात हयगय झाली तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. आता तालुक्यातील धान्याचा होणारा काळाबाजार साहेब नक्कीच थांबवतील, असे येथील जनतेला वाटू लागले आहे. पुढे येणारा काळच लोकांच्या या आशेला उत्तर देईल.

यातच देवरी तालुक्यातील चिचगड , चिचगड/भागी, देवरी , ककोडी, पालांदुर/जमी, गनुटोला, सींदिबीरी, लोहारा, केशोरी, गडेगाव, पलानगाव, वाढंरा, पिपरखारी, सुकळी/पालांदुर, घोनाळी अशा अनेक गावातील शेकडो लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका सन २०१८ पासून बनलेल्या आहेत. मात्र, अजूनही तालुक्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातील शेकडो लोक रेशन लाभापासून वंचित आहेत. या शिधापत्रिकाधारकांना सतत रेशनकार्ड ऑनलाईन करण्याकरिता देवरी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. कित्येक लाभार्थ्यांनी तर आशाही सोडल्या आहेत. पण पुरवठा विभागाचे काळिज काही केल्या द्रवत नसल्याचे चित्र आहे.  या लोकांचे रेशनकार्ड अनेक वर्षापासून ऑनलाईन न झाल्याने रेशनच्या लाभापासून त्यानां वंचित रहावे लागत आहे.

परिणामी, अशा शेकडो लाभार्थ्यांना धान्याभावी त्यांच्या मुलाबाळांसह कधी अर्धपोटी तर कधी पूर्ण उपाशी रहावे लागत आहे. यामुळ, हे वंचित लाभार्थी देवरीचे तहसीलदार श्री बोरुडे यांचेकडे आशेने पाहत आहेत. आता श्री बोरुडे या उपासमार होणाऱ्या जनतेचा रेशनकार्डाचा प्रश्न कायमस्वरुपी कसे सोडवतील, याकडे तालुकावासीय नागरिकांचे लक्ष लागले आहे.

blank