
देवरी:-येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना दिवस १० जून रोजी उत्साहात साजरा करण्यात करण्यात आला. राकाँ आमगाव-देवरी विधानसभा अध्यक्ष रमेश ताराम यांच्या हस्ते राकाँ पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी देवरी तालुका अध्यक्ष सी.के.बिसेन,वरिष्ट नेते भय्यालाल चांदेवार, मुन्ना अंसारी, चंचल जैन, सुजीत अग्रवाल, मुकेश खरोले, युगेश बिसेन, रंजन मेश्राम, पंकज शहारे, रवि बडवाईक, सुबोध देशपांडे,कैलास टेभंर्रे,सारंग देशपांडे, महिला तालुका अध्यक्ष पार्बताबाई चांदेवार, सुमन ताई बिसेन,शर्मीला टेंभुर्णीकर, सीमा साखरे, सरीता बडवाईकसह राकाँ पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्यानंतर सभेला मार्गदर्शन करताना रमेश ताराम यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोमाने व निष्ठेने कार्य करून जनतेच्या आशीर्वादाने राकाँ पक्षाच्या ऊमेदवारानां भरघोस मताने निवडून आणलेत, त्या सर्वांचे जाहीर आभार मानून कार्यकर्त्यांनी पुढे सुद्धा प्रामाणिकपणे एकनिष्ठेने प्रफुल्ल पटेल व रांजेन्द्र जैन यांच्या सोबतीने कार्य करावे असा सल्ला दिला.
देवरी तालुका अध्यक्ष सी.के. बीसेन यांनी पक्ष बांधणी व विविध विषयांवर चर्चा करून मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राकाँ देवरी शहर अध्यक्ष मुकेश खरोले यांनी केले. संचालन सुजीत अग्रवाल यांनी तर आभार प्रदर्शन पंकज शहारे यांनी केले.





