38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ महाप्रसादातून ४९ जणांना विषबाधा

महाप्रसादातून ४९ जणांना विषबाधा

0
14

blank

अमरावती,दि.24-जिल्ह्यातील आष्टी गावाजवळील वातोंडा हिम्मतपूर येथील २७ महिला व २२ पुरुष अशा एकूण ४९ लोकांना झाली विषबाधा झाल्याने त्यांना आष्टी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शारदा देवीच्या सार्वजनिक महाप्रसाद कार्यक्रमात जेवल्यानंतर त्यांना ही विषबाधा झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यातून गंभीर असलेल्या १३ रुग्णांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ३६ रुग्णांवर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे.

blank