तीन उपकमांडरसह सात माओवाद्यांचे आत्मसमर्पण

0
12

गडचिरोली दि.२४- जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तीन उपकमांडरसह सात नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. आत्मसर्मपण केलेल्या नक्षल्यांमध्ये कंपनी क्रमांक चारचा उपकमांडर जानू ऊर्फ सोनू गोंगलू गोटा (३२) रा. बुर्गी ता. एटापल्ली, शिरपूर-चिन्नूर दलमचा (तेलंगणा) उपकमांडर राजेश ऊर्फ काटेश्‍वरराव बोरिया कनिती (२७) रा. एट्रालपल्ली, जि. खम्मम, सीएनएम उपकमांडर निर्मला ऊर्फ सरिता दसरू नरोटे (३0) रा. कटेझरी ता. धानोरा, कुत्तुल दलमचा (छत्तीसगड) सदस्य असलेला श्यामराव ऊर्फ टांगरू मिसा उसेंडी (४५) रा. रेकनार ता. एटापल्ली, डिव्हीजनल स्टॉप टीममध्ये सदस्य म्हणून कार्यरत असलेला रतन मुंशी कोवासे (२२) रा. गट्टा ता. एटापल्ली, खोरार दलमची (छत्तीसगड) सदस्य सुशीला ऊर्फ सुखमोती राजू मडावी (३३) रा. नरकानार जि. कांकेर, कंपनी क्रमांक चारची सदस्य रम्मी ऊर्फ महानंदा मानू पोटावी (२१) रा. रेगडीगुट्टा ता. एटापल्ली अशी आत्मसर्मपण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे तीन उपकमांडरने नक्षल चळवळ सोडल्यामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे.
जानू गोटा याचा गेदा, कोटमी, तोडगट्टा, चेडवाही, इरूपगुट्टा, चंद्रांखंडी चकमक व तोंतेल फाटा ब्लास्ट आदी नक्षल कारवायांमध्ये सहभाग होता. त्याच्यावर ८ लाखांचे बक्षीस होते. राजेश कनिती हा २0१0 मध्ये सगरी दलममध्ये भरती झाला. त्याच्यावर सहा लाखांचे बक्षीस होते. लंकाचेन चकमक, चिन्नावट्रा, र्केगड, खुरसागुडम चमकीमध्ये त्याचा सहभाग होता. निर्मला ऊर्फ सरिता नरोटे हिच्यावर सहा लाखांचे बक्षीस होते. मुरचुल, रामटोला, जप्पी, तुतेकन्हार चकमकीमध्ये तिचा सहभाग होता. श्यामराव उसेंडीवर दोन लाखांचे बक्षीस होते. जप्पी, कोटमी चकमक, रेकानार येथील पाच ट्रॅक्टरची जाळपोळ या घटनांमध्ये त्याचा समावेश होता. रतन कोवासेवर २ लाखांचे बक्षीस होते. त्याचा नेलगुंडा, कोडसेपल्ली चकमकीत सहभाग होता. सुशीला राजू मडावी हिच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.
गोडलवाही ग्राम पंचायत जाळपोळ, काकडवेली, मरकेगाव, डोकेनटोला चकमक, राजेश कुवारीचा खून, चिचोडा येथील माजी सरपंचांचे अपहरण आदी घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महानंदा मोटावी हिच्यावर चार लाखांचे बक्षीस होते. बंदूर, मुंगनेर, हत्तीगोटा, पदाबोरिया चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.(नगर प्रतिनिधी) यातील बहुतांश नक्षल्यांनी कोटमी पोलीस स्टेशनसमोर आत्मसर्मपण केले असून या पोलीस स्टेशनसमोर आतापर्यंत १५ जहाल नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले आहे. यावर्षी आत्मसर्मपितांची संख्या ३४ वर पोहोचली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. छत्तीसगड पोलिसांसमोर नक्षल जोडप्याचे आत्मसर्मपण
नक्षल प्लाटुन कमांडर सुन्नू पोयामने पत्नीसह मालिणी माझी छत्तीसगड पोलिसांसमोर गुरूवारी आत्सर्मपण केले. पोयाम याने एके-४७ रायफलसह आत्मसर्मपण केले.मालिणी ही केवळ ७ वा वर्ग शिकलेली आहे. नक्षल्यांनी तीला डॉक्टरचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणातुन तिने वैद्यकीय ज्ञान प्राप्त केले. ती नक्षल्यांना लागलेल्या बंदुकीच्या गोळ्या काढत होती. त्याचबरोबर जखमेच्या भागावर टाके मारण्याचेही काम करीत होती.