फायटर प्लेन उडवणार महिला पायलट

0
5

नवी दिल्ली दि.२४- एअरफोर्समध्ये आता महिला पायलटही फायटर प्लेन उडवणार आहेत. डिफेन्स मिनिस्ट्रीने इंडियन एअरफोर्सच्या लढाऊ पथकामध्ये महिलांना सहभागी करण्यास मंजुरी दिली आहे. शनिवारी त्याची घोषणा करण्यात आली. एअरफोर्स अकादमीच्या सध्याच्या बॅचमधून महिला पायलट्ची निवड केली जाणार आहे. एअरफोर्स चीफ अरूप राहा यांनी एअरपोर्स डेला याबाबत घोषणा केली होती.

दिल्लीला लागून असलेल्या हिंडन एअरबेसवर राहा यांनी एअरफोर्स डे सेलिब्रेशनदरम्यान म्हटले होते, आमच्याकडे अशा महिला पायलट आहेत ज्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरही उडवतात. देशातील तरुणींची स्वप्ने पूर्ण व्हावी म्हणून आम्ही त्यांना फायटर स्ट्रीममध्ये आणत आहोत. नेव्हीचा विचार करता महिला वॉरशिपवर जाऊ शकत नाहीत. आर्मीमध्येही त्या लढाऊ पथकांमध्ये जाऊ शकत नाहीत. पण आता काळ बदलत आहे. फिजिकल टफनेस वाढवण्यात तंत्रही मदत करत आहे. एअरफोर्समध्ये अनेक महिलांनी हेलिकॉप्टर आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट उडवून त्यांच्या हिमतीचे दर्शन दिले आहे. काही महिला पायलटने तर लडाखच्या दौलत बेग ओल्डीमधून एएन-32 एयरक्राफ्ट सारखे मोठे एअरक्राफ्टही उडवले आहे.

महिलांची भागीदारी 8.5% आहे. ही तिन्ही दलांमध्ये सर्वाधिक आहे.- एअरफोर्समध्ये वुमन पायलट्सने आतापर्यंत ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरच उडवले आहेत.
– फोर्सच्या सात विंगमध्ये महिला काम करतात. अॅडमिनिस्ट्रेशन, लॉजिस्टिक्स, मिट्रियोलॉजी, नेव्हीगेशन, एज्युकेशन, एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि अकाउंट्स.
– एअरफोर्समध्ये एकूण 1500 महिला आहेत. त्यापैकी 94 पायलट आहेत. तर 14 नेव्हीगेटर आहेत.