34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News मिझोराममध्ये अपघातात 11 मृत्युमुखी

मिझोराममध्ये अपघातात 11 मृत्युमुखी

0
17

पीटीआय
ऐझवाल – दक्षिण मिझोराममधील लुंगलेई जिल्ह्यामध्ये दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात 11 नागरिक मृत्युमुखी पडले. काल (शनिवार) रात्री हा अपघात घडला असून यामध्ये अन्य 21 जण जखमी झाले.

मिझोरामची राजधानी असलेल्या ऐझवाल येथून ही बस लांगतलाई येथे जात असताना रमलैतुई गावाजवळ हा अपघात झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश असून त्यापैकी दोघी जणी गर्भवती होत्या. या अपघातामध्ये बसचा चालकही मृत्युमुखी पडला. या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

blank