गल्र्स महाविद्यालयात सात दिवसीय कार्यशाळेचा समारोप

0
9

गोंदिया,दि.२५-गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित एस. एस. गल्र्स महाविद्यालयात बी.सी.यू.डी.च्या वतीने ‘रिसर्च मेथडोलॉजी व स्टेटीस्टिक्सङ्क या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम पार पडला.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. के. बहेकार होते. कार्यशाळा आयोजिका गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. माधुरी नासरे, इंदिराबेन पटेल महाविद्यालय गोरेगावचे प्राचार्य डॉ. साहेबलाल भैरम व डॉ.राजश्री धामोरीकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रा. छाया पटले, प्रा. मोरे, प्राजक्ता रणविरे व पूजा तिवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेचे संचालन प्रा. संध्या वाहने यांनी केले तर आभार डॉ. धामोरीकर यांनी मानले. यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापवर्ग व कर्मचाèयांनी परिश्रम घेतले. या सात दिवसीय कार्यशाळेचा लाभ गोंदिया, भंडारा व नागपूर येथील अनेक प्राध्यापक व संशोधकांना प्राप्त झाला.