
गोंदिया,दि.26ः- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंकत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया शहरातील व्ही. व्ही. लॉन, अंगूर बगीचा येथे पार पडली.मलिक म्हणाले कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेच्या जनभावनेशी जोडलेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार व्दारे शासनाच्या गोरगरिबांना घरकुल, शेतकर्यांना उपयोगी कृषि योजना, कामगार हिताची कामे यारख्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवाल तरच जनता पक्षाच्या पाठिशी उभा राहिल. पक्ष जी जिम्मेदारी देईल ती कार्यकर्त्यांनी निष्ठेने सांभाळुन जनतेची कामे करावी. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची दखल पक्ष घेत असतो म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाची कामे आणि भुमिका सर्वसामान्यापर्यत पोहोचवून संघटनेला आणखी मजबुत करावे। यावेळी माजी आमदार श्री जैन म्हणाले की, कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष संघटनेची कामे करावी तसेच तळागाळातील लोकांना सोबत घेऊन आपल्या पक्षाची ध्येय – धोरणे जनसामान्यां जनते पर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक बजेट पार कोलमडून पडले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना जनतेपर्यंत पोहचवून आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे अधिकाधिक प्रतिनिधी निवडून आणण्याकरिता प्रयत्न करावे. कार्यक्रमात सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन,आमदार मनोहर चंंद्रीकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर, विनोद हरिणखेडे, बालकृष्ण पटले, रमेश गौतम, केतन तुरकर, अखिलेश सेठ, शैलेश वासनिक, रमन उके, शिवलाल नेवारे, राजु एन जैन, विनोद मेश्राम, सौरभ गौतम, राजेश परिहार, गुड्डू मिश्रा, संदीप पटले व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.





