
गोंदिया,दि.30ः- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या समस्यांना घेऊन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन डी. वाहणे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा नेते आनंद पुंजे, अध्यक्ष डी.टी. कावळे, सरचिटणीस एस.यू. वंजारी,प्रसिद्धी प्रमूख कृष्णा कापसे पदाधिकारी एम.ओ. रहांगडाले, डी.एस. ढबाले, एन.बी. सुलाखे डी.एम दखणे, के.बी. शहारे उपस्थित होते.
निवेदनानुसार व चर्चे दरम्यान प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांना जि.पी.एफ. कपातीच्या हिशोबाची पावती देण्यात यावी. सहाव्या वेतन आयोगाच्या जि.पी.एफ. मध्ये जमा झालेल्या राशीची स्वतंत्र पावती देण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा आधी नियमित कपातीची पावती देण्याची व्यवस्था करीत असून त्यानंतर स्वतंत्र पावती देऊ असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे डी.सी.पी.एस. धारक शिक्षकांच्या कपात केलेल्या सी.पी.एफ. हिशोबाची पावती बद्दल विचारणा करण्यात आली असता हे काम सुद्धा सुरू असून लवकरच पावत्या देऊ असे सांगितले.यासह विविध कामासाठी शिक्षकांच्या सेवापुस्तिका वित्त विभागात येतात तेव्हा अविलंब कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
मागिल वर्षभरात कोविड १९ व इतर कारणाने जिल्ह्यातील २0 शिक्षकांचा अकस्मात मृत्यू झाला असून त्यांना देय असलेल्या सर्व प्रकरणांना अविलंब निकालात काढण्याची यावे अशी मागणी संघटनेने केली असता प्रथम प्राधान्याने प्रकरणे निकालात काढण्यात येतील असे सांगितले.