
नांदेड–केंद्रातील भाजपप्रणित मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती प्रचंड वाढविल्या आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्यामुळे नांदेड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोदी सरकारचा इंधन दरवाढीसंदर्भात तीव्र निषेध करून धरणे आंदोलन केले.
मागील सात वर्षांपासून भाजप सरकार सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्यावतीने खोट्या व फसवे आश्वासने देऊन पुन्हा सत्तेत आले. दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या घरगुती गॅसच्या प्रचंड किंमती वाढवल्या. तसेच पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या किंमती वाढवून सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त करून टाकले आहे. त्यामुळे नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंधनाच्या दरवाढीचा तसेच केंद्र सरकार व पंतप्रधान मोदी यांच्या धोरणाच्याविरोधात घोषणेबाजी देत तीव्र निषेध करण्यात आला. ‘मोदी है तो, महंगाई मुमकीन है’ आदी स्वरूपाच्या घोषणा आंदोलनात दिल्या गेल्या. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निषेधासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र निषेधाच्या भावना सरचिटणीस गणेश तादलापूरकर, युवक शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. कल्पना डोंगळीकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. महम्मद खान पठाण यांनी व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या कल्पना डोंगळीकर, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड.मोहम्मद खान पठाण, शिख सेलचे प्रदेशाध्यक्ष जरनेलसिंघ गाडीवाले, शहर जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर, सय्ङ्मद ङ्कौला, माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर, शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे, तातेराव पाटील आलेगांवकर, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ.सिंधुताई देशमुख, लक्ष्मणराव मा.भवरे, युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार, युवती आघाडीच्या महमदी पटेल, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष राहूल जाधव, युनुस खान, व्हि.जे.एन.टी.सेलचे बच्चू यादव, सेवादलचे गोविंद यादव, धनंजय सुर्यवंशी, कमलबाई लांडगे, प्रेमजितकौर कोल्हापूरे, नागमणी चलवदे, रेणुका गावंडे, जया काटकर, सुमन जाधव, हसिना बेगम, शफि उर रहेमान, भिमराव क्षीरसागर, जिलानी पटेल, नितीन मामडी, अमित कांबळे, प्रकाश घोगरे, राहूल श्रीश्रीमाळ, पाशा खान तांबोळी, महेनजीब सय्यद, शेख सय्यीदा, गोसीया सय्यद, सिमरणकौर आनंद, निखील नाईक, माधव चिंचाळे, अब्दुल खदिर, अक्षय भुरेवाल, महमद दानिश, कृष्णा पाटील पुयड, गगणदिपसिंघ रामगडीया, विक्रम ठाकूर, आदिक भाई, जिलूभाई आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.





