33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय सालेकस्यात राकांपा पदाधिकाऱ्याचे सामूहिक राजीनामे

सालेकस्यात राकांपा पदाधिकाऱ्याचे सामूहिक राजीनामे

0
114

blank

साखरीटोला- सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्याना विश्वासात न घेता तालुका अध्यक्षाची निवडकरण्यात आली हे चित्र पाहून आम्ही अस्वस्थ झालो आहोत. त्याच उद्विग्नतेतून आम्ही सामूहिक राजीनामा देत आहोत असं राजीनामा पत्र राष्ट्रवादीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजयभाऊ शिवनकर, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्लभाई पटेल, माजी आ.राजेन्द्र जैन यांना दिलेल्या पत्रात नमूद केला आहे. सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी गोपालजी तिराले यांची नुकतीच वर्णी लागली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते उदासीन झाले असून त्याचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षवाढ़ीचे काम करू शकत नाही असा ठपका ठेऊन लक्ष्मणजी नागपूरे, तुकारामजी बोहरे, दौलतजी अग्रवाल, घनश्याम कटरे, विनोद अग्रवाल, निर्दोष साखरे, चंद्रपाल पटले, अर्जुनसिंग बैस, डेगेंद्र बघेले, लालसिंह दासरिया, सुखदास बसेना,प्रेमचंद लिल्हारे या पदाधिकाऱ्यानी 28 जून रोजी तडकाफडकीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्याना सामूहिक राजीनामे पाठवले आहे. तालुक्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्याना डावलन्यात आले. विश्वासात न घेता अध्यक्षपदाची निवड करण्यात आले त्यामुळे व्यथित झालो आहोत. त्याच उद्विग्नतेतून सामूहिक राजीनामा दिला आहे असे म्हणाले.

blank