40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय शिवसैनिक म्हणून शिवसेनेची ताकद निर्माण करा : चंदेल

शिवसैनिक म्हणून शिवसेनेची ताकद निर्माण करा : चंदेल

0
35

blank

आरमोरी–शिवसेनेचा बालेकिल्ला टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक गावातील जुने शिवसेनेचे शाखाप्रमुख, कार्यकर्ते पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्कल नुसार कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्यात. संपर्क अभियान मोहीम उत्कृष्टरित्या पार पाडावी. शिवसैनिक म्हणून शिवसेनेची ताकद निर्माण करावी, असे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले.
शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार १२ ते २४ जुलै पयर्ंत शिवसेना जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेचा शुभारंभ आरमोरी तालुक्यात आरमोरी येथील दुर्गा मंदिराच्या सभागृहात करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, उपजिल्हाप्रमुख अरविंद कातट्रवार, पंसचे माजी सभापती चंद्रशेखर मने, जिपच्या माजी सभापती वेणू ढवगाये, युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, नपचे बांधकाम सभापती सागर मने, नगरसेवक माणिक भोयर उपस्थित होते. घराघरात शिवसेना पोहोचण्यासाठी अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते तयार आहेत. फक्त त्यांच्या घरापयर्ंत पोहोचण्याची जबाबदारी आपल्या सर्व शिवसैनिकांची असून आरमोरी विधानसभा मतदारसंघ एक वेळचा बालेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्रांमध्ये शिवसेनेच्या मतदानावर आजपासून तयारी करणे आवश्यक आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन याप्रसंगी अरविंद कातट्रवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अँड. विजय चाटे यांनी मानले.

blank