34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ कलावंत मानधन समीतीसाठी पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन छेडणार

कलावंत मानधन समीतीसाठी पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन छेडणार

0
35

blank

– युवा स्वाभिमान पार्टीचा इशारा
बुलडाणा–जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही वृध्द कलावंत मानधन समीती गठीत करण्यात आली नाही. 15 दिवसात कलावंत मानधन समीती गठीत झाली नाही तर 2 ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या घरासमोर भजन आंदोलन करणार असल्याचे यूवा स्वाभिमान पार्टीचे उपाध्यक्ष ईश्वरसिंग चंदेल यांनी म्हटले आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात 16 जुलै रोजी कलावंताचा वतीने चर्चासत्र घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

वृध्द कलावंत मानधन समीती गठीत करून वृध्द कलावंताना तात्काळ मानधन देण्यात यावे या मागणीसह इतर मागण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांचे कलावंताचे अर्ज शासनदरबारी धूळ खात पडून आहे. त्यामुळे कलावंताना मानधनापासून वचींत राहावे लागत आहे. कोरोनामुळे कलावंतांचे कार्यक्रम बंद आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत यूवा स्वाभिमान पार्टीने प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले. परंतू त्याचा काही परीणाम झाला नाही म्हणून येणार्‍या 15 दिवसामधे समीती गठीत झाली नाही तर यूवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने पालकमंत्री महोदयांच्या घरासमोर भजन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी श्रीराम परिहार, शंकर मोरे, स्वप्नील शिंगणे, आत्माराम गायकवाड, दामू अण्णा इंंगळे, किसन चव्हाण, गजानन झगडे, शंकरसिंग मोरे, गुलाबराव सोलंकी, भरत इंगळे, अरुण शिंगणे, रमेश पाटील, किरणसीह ठाकूर, सूगदेव झाडे, रमेश गायकवाड, महेश पंडित, गणेश सूरसे, ज्ञानेश्वर शिंगणे, दामोदर पिंपळे, गणेश सपकाळ यांची उपस्थिती होती.

blank