35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home क्रीडा या महिन्यात होणार युवराज – हेझलचा साखरपुडा?

या महिन्यात होणार युवराज – हेझलचा साखरपुडा?

0
21

blank

मुंबई, दि. ४ – भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या लग्नानंतर आता भारताचा आणखी एक ‘एलिजेबल बॅचलर’ बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांचा येत्या नोव्हेंबरमध्ये साखरपुडा होणार असून पुढील वर्षी फेब्रुवारीत ते  लग्नगाठीत अडकणार असल्याचे वृत्त आहे.
बॉडीगार्ड चित्रपटात करीना कपूरसोबत महत्वाची भूमिका निभावणारी हेजल आणि युवराजचे प्रेमप्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. युवराजची आत्तापर्यंत अनेक प्रेमप्रकरणं गाजली आहेत, मात्र हेजलबाबत तो खूप सीरिअस आहे.

blank