एसटीची दरवाढ करून शिवसेनेचीही पाकीटमारी

0
8

मुंबई, दि.4- पंजाने किती ओढणार आणि दातांनी किती खाणार याची स्पर्धाच आता भाजपा-शिवसेनेत पाहायला मिळेल. सर्वसामान्यांवर अतिरिक्त करभार लादून शिवसेनेचेही मंत्री पाकीटमारीचा नवा प्रयोग करत आहेत, अशी टीका आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 5 ते 25 नोव्हेंबर पर्यंत एसटीच्या तिकिटावर अतिरिक्त कर लावला आहे. सध्या एसटीवर 10 टक्के, निमआराम 15 आणि लक्झरीवर 20 टक्के कर लावण्यात आला आहे. सर्वसामान्य नोकरदारवर्ग दिवाळीच्या निमित्ताने या कालावधीत गावाला जात असतो. हीच संधी साधून जनतेची लूट केली जात आहे, असे मत मलिक यांनी मांडले. गाईवर चर्चा करू नका, महागाईवर करा, असे सेना सांगत होती. मग आता या महागाईच्या बाबतीत काय? भाजपने दुष्काळ कर लादल्यावर त्याला पाकीटमारी असे शिवसेना संबोधत होती. पण आता सेनेचेच मंत्री पाकीटमारी करत आहेत, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी या निर्णयावर टीका केली.