आरएसएसचे प्रचारक मधुकर लिमये यांचे निधन

0
15
मुंबई, दि. ४ – राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुजी लिमये यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे. लिमये यांच्यावर संध्याकाळी सात वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मधुकर लिमये गेली ६० वर्षे आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत होते. लिमये आसाममध्ये “मधुजी कोका’ म्हणून प्रसिद्ध होते.