38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाकप तर्फे जिल्हाधिका-याना निवेदन

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाकप तर्फे जिल्हाधिका-याना निवेदन

0
32

blank

भंडारा -: दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आठ महिने पूर्ण झाल्याने शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधानमंत्री यांना  निवेदन पाठविण्यात आले.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव  कॉम्रेड हिवराज उके यांच्या नेतृत्वात खालील मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी स्वीकारले.निवेदनात केंद्र सरकारने लादलेले तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा.शेती मालाला हमी भावासाठी एम एस पी लागू करा.विज बिल विधेयक 2020 मागे घ्या.शेतकऱ्यांना युरिया खताचा  मुबलक प्रमाणात व स्वस्त दरात पुरवठा करा.पेट्रोल डिझेल व गॅसच्या वाढलेल्या किमती मागे घेण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.
   शिष्टमंडळात कॉम्रेड हिवराज उके जिल्हा सचिव भाकप, कॉम्रेड वाल्मीक नागपुरे अध्यक्ष शेतमजूर युनियन, कॉम्रेड गजानन पाचे तालुका सचिव भाकप, काॅमरेड महादेव आंबा घरे, गणेश चिचामे , कॉम्रेड प्रकाश वाहने, कॉम्रेड रमेश पंधरे, काॅ. प्रकाश उईके ,काॅमरेड अनमोल सांगोडे,काॅ.प्रकाश वाहने इत्यादींचा समावेश होता.

blank