
कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):–सडक अर्जुनी तालुका युवासेना व शिवसेनेच्या वतीने दि.14 जुलै ला शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या, तसेच नगरपंचायत सफाई कामगारांच्या समस्या या सर्व समस्याबाबद मा. मुख्याधिकारी नगरपंचायत सडक अर्जुनी यांना पत्र देण्यात आले होते. आणि समस्या जर लवकर निकाली काढण्यात आली नाही तर मुख्य रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी चेतावणी निवेदनद्वारे दिली होती. त्यानुसार नगरपंचायत प्रशासनाने समस्या निकाली न काढता तसेच त्याबाबतचे पत्रसुद्धा न देता सातत्याने दुर्लक्ष केले, म्हणून दिनांक 26 जुलै रोजी सोमवारला तालुका युवा सेना व शिवसेना च्या वतीने सडक-अर्जुनी येथील मुख्य मार्गावर येऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र रस्ता रोको आंदोलनाची दखल घेत डुगीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगळे यांनी मध्यस्थी घेत मुख्याधिकारी नगरपंचायत सडक-अर्जुनी यांच्याशी चर्चा घडवून आणली. यावेळी मुख्याधिकारी नगरपंचायत सडक-अर्जुनी यांनी समस्या ऐकून घेत सर्व समस्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे लगेच रास्ता रोको आंदोलन पूर्ण करण्यात आले. सदर रास्ता रोको आंदोलन शिवसेना जिल्हा संघटक राजूभाऊ पटले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. तर या आंदोलनात सहभागी म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख मनोज रामटेके,युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश डुंभरे, युवा सेना तालुका अधिकारी सचिन फुंडे,शिवसेना शहर प्रमुख महेंद्र वंजारी,शिवसेना तालुका प्रसिद्धीप्रमुख अश्लेष माडे, बबन बडोले, सतीश गहाणे, सौरभ गोस्वामी,विषाल उजवणे,अशोक केवट,खुशाल देशमुख,मेंढे, कुंबरे, अविरत पुरी, हिमकला ताई प्रधान तसेच तालुक्यातील समस्त युवासेना कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.





