34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद – खासदार सुनिल मेंढे

कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद – खासदार सुनिल मेंढे

0
49

blank

अर्जुनी मोर.दि.2 :-एक एक कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद आहे, त्यामुळे बुथ रचना सक्षम करून पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले.

दि.तालुका शेतकी खरेदी विक्री अर्जुनी मोरगाव येथे आयोजित भाजपाच्या तालुकास्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. कुठलाही पक्ष कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मोठा होतो. कार्यकर्ता सक्षम होणे आणि त्या माध्यमातून पक्ष वाढविणे नितांत गरजेचे आहे. बळकट झालेल्या पक्षाच्या माध्यमातून लोकहिताच्या कामासाठी झटण्याचा संकल्प प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांनी करावा. बूथ स्तरापर्यंत प्रत्येक गोष्टीची दखल केंद्र स्तरावरून घेतली जाते. असेही यावेळी खासदारांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी सौ.रचनाताई गहाणे, जिल्हा महामंत्री लायकरामजी भेंडारकर, तालुकाध्यक्ष अरविंदजी शिवणकर, उमाकांत ढेंगे, गजाननराव डोंगरवार, भोजुभाऊ लोगडे, शिवनारायणजी पालीवाल, नामदेवरावजी कापगते, केवळराम पुस्तोडे, मंजुषा तरोने, गीताताई ब्राह्मणकर, मीनाताई शहारे, गिरीधर झोडे, देवेंद्र टेंबरे, विजय कापगते, व्यंकट खोब्रागडे,नुतन सोनवाने, मधुकरजी दुणेदार,संदिप कापगते, विनोद नाकाडे, रामदासजी कोहडकर, मुरलीधर ठाकरे व शेकडो भाजपा पदाधिकारी उपस्थित होते..

blank