
गोंदिया,दि.3 : महसूल प्रशासन हे लोकांचे हित जोपासणारे असून महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे,
असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले.
1 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी व अप्पर तहसिलदार कार्यालयाच्या संयुक्त
वतीने नविन प्रशासकीय इमारतमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल दिन साजरा
करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्रीमती सवरंगपते बोलत होत्या. यावेळी अप्पर तहसिलदार अनिल
खडतकर व नायब तहसिलदार रामेश्वर पालांदूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्रीमती वंदना सवरंगपते पुढे म्हणाल्या, शासनाचा मध्यवर्ती विभाग म्हणून सदैव कार्यरत असलेला विभाग
म्हणजे महसूल विभाग आहे. महसूल विभागाच्या कामाचा पाया ठेवतांना महसूल विषयक वसुली आणि कायदा व
सुव्यवस्था राखणे या उद्देशाने सुरुवात झाली आहे. परंतू महसूल विभागामार्फत गौण खनिज, अनधिकृत कारवाई,
करमणूक कर, विविध खात्यांची वसुली, सर्वप्रकारच्या निवडणूका, जनगणना, आधारकार्ड, शासकीय सामाजिक
योजना, रहिवासी, मिळकत, राष्ट्रीयत्व, ज्येष्ठ नागरिक, भूमिहीन-अल्पभूधारक शेतकरी इतर प्रमाणपत्रे तयार करणे,
त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती बाबतची कामे महसूल विभागातील प्रत्येक वर्गातील अधिकारी-कर्मचारी करीत
असतात. शासनाच्या प्रत्येक कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका असते. अर्थातच मागील दोन वर्षापासून
नैसर्गिक आपत्ती, कोरोना आपातग्रस्त परिस्थितीत गोंदिया तालुक्यातील अधिकारी वर्ग, तहसिलदार, नायब
तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांनी कोरोना या आपातग्रस्त परिस्थितीत गोंदिया उपविभागातील
प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी कोरोना युध्दात अहोरात्र काम केले असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र व
गौरवचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मंडळ अधिकारी सर्वश्री बी.एन.वर्मा, श्री भेंडारकर, श्री पोरशेट्टीवार, तलाठी सर्वश्री बी.एन.भगत,
डी.एन.बनोटे, अमित बडोले, अविनाश घडोले, आर.एस.तांबूलकर, श्रीमती डिलेश्वरी पटले, कोतवाल कपिल हारोडे
व नविन प्रशासकीय इमारतमधील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन सारीका बन्सोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार डिलेश्वरी पटले यांनी मानले.





