
सडक अर्जुनी येथे काँग्रेस मेळावा
सडक अर्जुनी- शहरातील आशीर्वाद लॉन येथे सड़क अर्जुनी तालुका कांग्रेस कमेटी द्वारा आयोजित ‘व्यर्थ न हो बलीदान , चलो बचाये संविधान ‘ कॉंग्रेस मेळाव्यात मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले आता पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची किंमत केली जाईल ,आता सर्वांनी आपल्या घराच्या दर्शनी भागावर पक्षाचा झेंडा लावा , बॅनर लावू नका त्या झेंड्यातच मी दिसेन ,असे उद्गार आमदार पटोले यांनी केले आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी बूथ कमिट्या नियुक्त करणे, प्रामाणिकपणे काम करणे, हेच आपल्या कार्यकर्त्यांचे ध्येय आहे . पुढील काळात गोंदिया चे पालकमंत्री ही काँग्रेस पक्षाचे राहतील, असे उद्गार त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान होते.मंचावर प्रदेश सचिव अमर वराडे, पी.जी. कटरे, आ. अभिजीत वंजारी, माजी आमदार दिलीपभाऊ बन्सोड, माजी आमदार बबनराव चौधरी व माजी आमदार खतीब भाई अकोला, कॉंग्रेस नेते चंद्रशेखर शुक्ला छत्तीसगड,रत्नदिप दहीवले,रामलाल राऊत,ऊषा शहारे,दामोदर नेवारे, ओबीसी विभाग अध्यक्ष जितेन्द्र कटरे, जिल्हा महासचिव पुष्पा खोटेले, किसान कॉंग्रेस अध्यक्ष जितेश राणे, तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोडे,राजेश नंदागवळी, अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष परवेज बेग, आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व शहर अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे त्या़नी भाजपा च्या केंद्र सरकार वर घानाघाती प्रहार करित देशाच्या स्वातंत्र्या पासुन देशाच्या बांधनी साठी कांग्रेस पक्षाने रक्त सांडविले असुन भाजपा केंद्र सरकार सार्वजनिक मालमत्ता फक्त विकण्याचे काम करित आहे यापासुन जनतेने सावध होण्याची गरज असल्याचे सांगितले,आणि भाजपाच्या तत्कालीन राज्य सरकार व आजच्या केंद्र सरकार ने ओबीसी वर्गाची फसवणूक केली आहे,असेही यावेळी बोलले. सर्वांना न्याय देणा-या संविधानिक प्रावधांनांना बाजुला ठेवुन केंद्र सरकार मानमानी कारभार करित असल्याची आठवण जनतेला करुण दिली. यावेळी प्रांताध्यक्ष नाना भाऊ पटोले याचे हस्ते कांग्रेस पक्षाचे तालुका महासचिव म्हणून हरिष कोहळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले ,यावेळी प्रांताध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन शेकडो कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षत प्रवेश केला. कांग्रेस पक्षाचा तिरंगा दुपट्टा घालुन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रांताध्यक्ष नाना भाऊ पटोले यांचे हस्ते नवनियुक्त प्रदेश सचिव अमरभाऊ वराडे व पी जी कटरे यांचा व नुकतेच कांग्रेस पक्षत प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप बन्सोड या सर्वांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन दामोदर नेवारे यांनी केले तर प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोडे यांनी केले व प्रदर्शन आभार शहर अध्यक्ष अनिल राजगिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा खोटेले, महेश सोनवाने, चुळमन लांजेवार, किरन हटवार, ब्रम्हानंद मेश्राम , अर्जुन घरोटे,ईश्वर लंजे, किशोर शेंडे, वामेश्वर टेंभरे , महेंद्र पशिने, रंजना भोई, हरिष कोहळे, निशान राऊत, सरीता कापगते मुरलीनाथ ठाकरे , दिनेश हुकरे , नासीर पटेल, प्रकाश बापु मडावी, अलाउद्दीन राजाणी, हेमु वालदे, शंकर मेंढे, रेहान शेख, वीरु गौर, निलेश लाडे, संजय प्रधान, शरद नागपुरे लेखलाल टेकाम , योगेश येडे, सुखदास मेश्राम, विलास कापगते, दिपक वैद्य, राजेश रामटेके, सिंधु बारसागडे, गायत्री ईरले, माया चौधरी,निना राऊत, मीरा झोडावणे, जयश्री मुंगुलमारे, देवचंद् शिवणकर, नेतराम देशमुख, शाहीद पटेल, धनराज आसटकर, सुधाकर कुर्वे, रामकृष्ण चुटे, धनराज येरपुडे, नंदकिशोर डोंगरवार, विस्मय बडोले,थानेंद्र तुरकर, निताराम भोयर, अनवर पठाण, निखिल कोटांगले, ज्ञानेश्वर खोटेले , देबीलाल घुमके, रोशन शिवणकर, विकास कोरे, धनराज शेंडे, कांता नागोसे, अनिल बोरकर, देवानंद गभणे, वासुदेव पटोले, संतोष लाडे, शिवलाल शाहारे, गोविंदा ठलाल, कैलाश रामटेके, शिवा चांदेवार ,याकत अली शय्यद, नरेश मेश्राम, फुलचंद चौरे, प्रदीप मेश्राम, संतोष ठाकरे, रविन्द्र अंबुले, राजेंद्र जमदाळ, धनराज लटये, निलकंठ परशुरामकर , राजेंद्र आरसोडे, राजकुमार मसराम जितेंद्र चौधरी, युवराज काळसर्पे, आशिष धुर्वे,संदिप शाहारे, इत्यादिंनी अथक परिश्रम घेतले.





