38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय विधानपरिषदेच्या 17 पैकी 5 जागा बिनविरोध, 12 ठिकाणी महायुती आणि मविआ आमने...

विधानपरिषदेच्या 17 पैकी 5 जागा बिनविरोध, 12 ठिकाणी महायुती आणि मविआ आमने सामने

0
29

blank

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राज्यभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर महाविकास आघाडीने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मविआच्या काही उमेदवारांनी संख्याबळाचे कारण, मित्रपक्षांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत माघार घेतली. तर, महायुतीच्या नेत्यांना देखील बंडखोरांना शांत करण्यात यश आले. नितेश राणे थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण विधानपरिषदेचे उमेदवार बाळ माने यांना अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तर, नाशिकमध्ये गोकुळ गीते अर्ज माघारीवरुन चर्चेत राहिले, तर गणेश गीते यांनी सकाळीच अर्ज मागे घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या, यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका जागेवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला.
:5 जागा बिनविरोध, 12 ठिकाणी लढती
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : रायगडमध्ये महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, बाळ माने मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शेकापच्या अरविंद म्हात्रे यांच्याकडून अर्ज मागे घेण्यात आला. पक्षविरोधी कारवाईमुळं बाळ मानेंची ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केले. या मतदारसंघात अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झाले.

पुणे : पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून आज राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी माघार घेतली. तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने विक्रम काकडेंच्या बिनविरोध विजयाचा मार्ग सुकर झाला. पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे बिनविरोध विजयी झाले.

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर करण ससाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो देखील त्यांनी मागे घेतला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाकी होता. शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरेंचा अर्ज मागंे घेतल्याच समोर आले. दत्तात्रय पानसरे यांनी अर्ज मागे घेतला नसल्याचे म्हटले.

ठाणे: ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली मात्र त्यांनी देखील माघार घेतली. रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले.

नाशिक : नाशिक स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चर्चेत राहिला. हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असून तिथून नरेंद्र दराडे उमेदवार आहेत. भाजपच्या गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला. यामुळं या ठिकाणी नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होईल.

यवतमाळ : यवतमाळ स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली. त्यामुळं मविआकडून सय्यद फारूख यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरु होता. मात्र, सय्यद फारुख यांनी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले.

सांगली सातारा : शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं शंभराज देसाई यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेतला. या ठिकाणी धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप अशी लढत होईल.

नागपूर- नागपूरमध्ये काँग्रेसचे दुसरे क्रमांकावर असलेले उमेदवार दिनेश ढोले, शेकापचे अपक्ष उमेदवार सुरेंद्र लोही, राजेंद्र जंगले यांनी घेतले उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे. या ठिकाणी अतुल लोंढे यांच्या विरोधात महायुतीचे डॉ. राजीव पोतदार असतील.

सोलापूर : सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीतून आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांनी माघार घेतली. सोलापूर विधानपरिषदेत भाजपचे राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख या दोघांचेच अर्ज आहेत. नागेश अक्कलकोटे यांचा निर्णय स्पष्ट झाला नव्हता.

नांदेड : महायुतीला नांदेडमध्ये देखील बंड शमवण्यात यश आले. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतली. याठिकाणी काँग्रेसचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर

भंडारा-गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांची उमेदवारी कायम आहे. या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर प्रफुल अग्रवाल यांनी उमेदवारी मागे घेतली.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : या मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

अमरावती : अमरावती स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचितचे निलेश विश्वकर्मा आमने सामने आहेत.

परभणी हिंगोली : परभणीत शिंदे सेनेचे सईद खान,उबाठा सेनेचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसच्या सुशील देशमुख यांचा अर्ज या ठिकाणी कायम राहिला. तर, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

धाराशिव-लातूर-बीड : महायुतीकडून भाजपचे बसवराज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख निवडणूक आखाड्यात आहेत. धाराशिव लातूर बीड विधान परिषदेतील सर्व सात अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

जळगाव : जळगाव विधान परिषदेसाठी आतापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार आसिफ मोहम्मद, सुनील जंगले, प्रवीण पाटील या उमेदवारांनी माघार घेतली असून तसेच अपक्ष उमेदवार कलीम मणियार, उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख निलेश चौधरी यांनी माघार घेतली आहे शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार दीपक धांडे, यांनी माघार घेतली आहे. शिंदेच्या सेनेच्या रेश्मा काळे यांनी माघार घेतलेली नाही. भाजपकडून नंदकिशोर महाजन आणि ठाकरेंच्या सेनेकडून शरद तायडे रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजीनगर-जालना : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे आमने सामने आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं ज्यांना उमेदवारी दिलेली त्या देवयानी डोणगावकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघातून समीर सत्तार यांनी देखील माघार घेतली.

बिनविरोध विजयी उमेदवार
1.वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
2.पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस
3.ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना
4.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
5. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना

blank