कोहका येथे आमदार रहांगडालेंच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन

0
27

गोंदिया- तालुक्यातील ग्रामपंचायत सेजगाव खुर्द अंतर्गत येणाऱ्या ग्राम कोहका मध्ये २५१५ अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धनेंद्र अट्रे होते.यावेळी मदनभाऊ पटले,नेहरू उपवंशी,सरपंच अर्चनाताई कंसरे, ग्राम सचिव प्रीतीताई साखरे, उपसरपंच प्रमोदभाऊ पटले, तंटामुक्ती अध्यक्ष भोजलाल बिसेन,ग्रा.पं. सदस्य भरतजी टेकाम, संतोषजी पटले, अनिताताई रहांगडाले, आशाताई चिखलोंढे, सोनूताई चिखलोंढे, राकेशजी खरोले.उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रकाश पटले, छगन पटले,देबीलाल बिसेन,संजीत खरोले,भक्तप्रल्हाद चिखलोंढे,रामेश्वर चिखलोंढे व गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार रहागंडाले यांनी आपण लोकप्रतिनिधी म्हणून सदैव आपल्या सोबत असल्याचे आश्वासन देत विकासकामाकरीता निधीची कमतरता पडणार नसल्याचे सांगितले.तसेच आरोग्य सुविधा, आत्मनिर्भर भारत, वोकल फॉर लोकल अशा विविध बाबींवर चर्चा केली. उपसरपंच प्रमोद पटले यांनीही यावेळी आमदारांच्या कार्याची प्रशंसा करीत नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे विचार व्यक्त केले.