खासगी अनु.कर्मचारी सह. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बी.डब्लु.कटरे यांची बिनविरोध निवड

0
41

गोरेगांव,दि.16 सप्टेंबरः- गोरेगाव येथील खाजगी अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे वर्तमान अध्यक्ष प्राचार्य व्यासनारायण पटले 30 सप्टेंबर 21 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा  राजीनामा दिल्यामुळे नंतरच्या कार्यकाळासाठी मोहगाव येथील परशुराम विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांची, अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक सभेचे आयोजन 15 सप्टेबंरला संस्था कार्यालयात करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्यासनारायण पटले होते.या प्रसंगी संचालक जगदीश अग्रवाल,राजानंंद धारगावे, दामोदर रहांगडाले,लिलाधर चंद्रिकापुरे,योगेश्वर चौधरी,दिगंबर बिसेन, प्रल्हाद ठाकूर, शेखर उके, खुशाल मसराम,श्रीमती शकुंतला बघेले,बी.डब्लु.कटरे उपस्थित होते.
सभेसमोर, संस्थेच्या घटने नुसार जे सभासद सेवानिवृत्त होतात ,त्यांचे पतसंस्थेचे सद्यस्यत्व रद्द होते .या पार्श्वभूमीवर कार्यरत अध्यक्षांची जागा रिक्त झाली,या अनुषगांने सभाध्यक्ष व्यासनारायण पटले यांनी बी.डब्लु.कटरे यांच्या नावाची सूचना केली व लिलाधर चंद्रिकापुरे यांनी अनुमोदन दिले.परीणामी बी.डब्लु.कटरे यांची अध्यक्षपदी सर्वानूमते तथा बिनविरोध निवड करण्यात आली.