विद्युत शॉक लागून आजी नातवासह तिघांचा मृत्यू

0
64

चामोर्शी— तालुक्यातील आष्टी पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राममोहनपूर विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने आजी-नातू व शेजारील एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शेतशिवारात घडली.
प्राप्त माहितीनुसार रामकृष्ण विश्‍वास याने आपल्या शेतातील मच्छी खड्डा असलेल्या ठिकाणी तार पसरून त्याला विद्युत करंट लावले होते. परंतु ते त्याच्या मुलाला माहित नसल्याने राजू रामकृष्ण बिश्‍वास (१८) राममोहनपुर व वीरकुमार सुभाष मंडल (११) हे दोघे काल सकाळी अकरा वाजता शेतात गेले असता विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जागीच गतप्राण झाले. सायंकाळी हे दोघे घरी परत न आल्याने शेतावर शोध घेण्याकरिता शेतात राजूची आजी आणि विरकुमारची आई गेले असता दोघेही गतप्राण झाल्याचे दिसल्याने कमला बिश्‍वास आपल्या नातवाला पाहून त्याच्या अंगाला स्पर्श केली असता जिवंत विद्युत प्रवाह सुरू असल्याने आजीचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती विरकुमारची आई हिने गावात जाऊन नागरिकांनी सांगितली. त्यानुसार पोलीस पाटील व सरपंचांनी आष्टी पोलिसांना माहिती दिली . माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पोलीस निरीक्षक कुमारसीग राठोड व पोलीस उपनिरीक्षक गणेश जगले, सहाय्यक फोजदार संजय गोंगले, चंद्रप्रकाश निमसरकार, राजू पचपुल्लीवार, झानेशवर मस्के, अविनाश कासेट्टीवार, महिला पोलीस शिपाई रमा सदाशिव, यांनी जाऊन पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे शवविच्छेदनाचा करिता आणण्यात आले. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात कलम ३0४ भा.द.वि.सह कलम १३५ विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंह राठोड यांचे मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक जंगले व कर्मचारी करीत आहेत.