42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांकडून एकाची हत्या

एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांकडून एकाची हत्या

0
32
file photo

blank

एटापल्ली —-तालुक्यातील सुरजागड येथील सोमाजी चैतू सडमेक (वय ५0) या इसमाची नक्षल्यांनी रविवारी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमाजी सडमेक यास शनिवार रात्री नक्षल्यांनी घरून बोलावून जंगलात नेले होते. मात्र रविवारी सकाळी सुरजागडपासून काही अंतरावर असलेल्या मंदिराजवळच्या हातपंपाशेजारी सोमाजीचा मृतदेह आढळून आला. नक्षल्यांनी घटनास्थळी पत्रक टाकली होती. जल, जंगल व जमिनीला लुटणार्‍यांना अशीच शिक्षा मिळेल, भाजपा, शिवसेना आणि राकाँच्या दलाल नेत्यांनाही हाकलून लावा, असा मजकूर पत्रकात लिहिला होता.
सुरजागड पहाडावर मागील तीन-चार महिन्यांपासून लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. यास नक्षल्यांचा विरोध असून त्यांनी तशी पत्रकेही टाकली होती. मात्र, लोहखनिज उत्खनन करणार्‍या कंपनीने स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात पावले उचलली होती. त्या अनुषंगाने सोमाजी सडमेक याने कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती म्हणून नक्षल्यांनी त्यांची हत्या केली असावी, अशी चर्चा आहे.

blank