37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय गोंदिया जिल्हा काँग्रेसची सर्वसाधारण सभा उत्साहात

गोंदिया जिल्हा काँग्रेसची सर्वसाधारण सभा उत्साहात

0
47

blank

गोरेगाव,दि.22ः- गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची वार्षीक सर्वसाधारण सभा 20 सप्टेंबर 2021 रोजी  गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कुलच्या सेमिनार हॉल मध्ये गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.एन.डी.किरसान यांचे अध्यक्षतेखाली  आमदार सहेसराम कोरोटे, प्रदेश सचिव अमर वराडे, प्रदेश सचिव पी.जी. कटरे, माजी आमदार दिलीपीभाऊ बन्सोड , माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम ( बाबा ) कटरे, कार्यध्यक्ष रत्नदिप दहिवले , माजी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, जेष्ठ नेते झामसिंगभाऊ बघेले, युवा नेते अशोक(गप्पु )गुप्ता यांचे प्रमुख उपस्थीतीत पार पडली. या सभेचे आयोजन पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणूका डोळयासमोर ठेवून समन्वय साधण्याच्या व संघटीतपणे कामाला लागण्याच्या हेतुने करण्यांत आले होते. सभेत बुथ कमिटया बळकट करण्याबाबत सुचना देण्यात आल्या तसेच आपसातले मतभेद विसरुन कामाला लागण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषद क्षेत्र निहाय पर्यवेक्षकांची नियुक्ती करुन परिस्थीतीवर नियंत्रण करण्याचे ठरले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे नवनियुक्त प्रदेश सचिव अमर वराडे, पी.जी.कटरे, तसेच आमदार सहेसराम कोरोटे, दिलीपभाऊ बन्सोड, बाबा कटरे रत्नदिप दहिवले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यांत आला. या सभेत जिल्हयातील सर्व आजी माजी पदाधिकारी आजी माजी आमदार याच्यात एकता व सुसुत्रता दिसुन आली.याचा फायदा निश्चितच जि.प. व नगरपंचायत निवडणुकीत दिसून येईल अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष एन.डी.किरसान व आमदार सहेसराम कोरोटे यांनी व्यक्त केले. सभेला डॉ. एन.डी.किरसान आमदार कोरोटे, प्रदेश सचिव अमर वराडे व पी.जी. कटरे यांनी मार्गदर्शन केले माजी आ. दिलीपभाऊ बन्सोड यांनी प्रास्ताविक केले व कार्याध्यक्ष रत्नदिप दहिवले यांनी आभार प्रदर्शन केले. सभेला उपाध्यक्ष रामलाल राऊत, सी.टी.चौधरी, महासचिव यादनलाल बनोठे, पृथ्वीराज चव्हान, दामोदर नेवारे, जगदिश येरोला, पुष्पाताई खोटेले व रमेश लिल्हारे, सचिव इशुलाल भालेकर, विशाखा साखरे, डॉ. संजय देशमुख, निकेश मिश्रा, व संजय वाहाने, कार्यकारीणी सदस्य कैलास अग्रवाल, वंसत पुराम, अनिल राजगिरे, कृष्णा सहारे, नितिन पुगलिया, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा उषा शहारे, युवक काँग्रेस अध्यक्ष अलोक मोहंती, एनएसयुआय अध्यक्ष हरिष तुळसकर, ओबिसी सेल अध्यक्ष जितेन्द्र कटरे, किसान काँग्रेस अध्यक्ष जितेश राणे, अनु.जाती विभाग अध्यक्ष अमित भालेराव, अल्पसंख्याक अध्यक्ष परवेज बेग, सोसल मिडीया अध्यक्ष योगेश (बापु )अग्रवाल, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, डॉक्टर्स सेल अध्यक्ष विवेक मेंढे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष प्रकाश पंचभाई, गोंदिया शहर अध्यक्ष जहिरभाई अहमद, तिरोडा तालुका अध्यक्ष राधेलाल पटले, तिरोडा शहर अध्यक्ष ठमेन्द्र सींह चौव्हान, गोरेगांव तालुका अध्यक्ष डेमेन्द्र रहांगडाले, गोरेगांव शहर अध्यक्ष खिरचंद येळे, स.अर्जुनी तालुका अध्यक्ष मधुसुधन दोनोडे, शहर अध्यक्ष अनिल राजगिरे, मोरगांव अर्जुनी तालुका अध्यक्ष भागवत पाटील नाकाडे, मो.अर्जुनी शहर अध्यक्ष अजय पशिने, देवरी तालुका अध्यक्ष संदिप भाटिया, आमगांव तालुका अध्यक्ष संजय बहेकार, सालेकसा तालुका अध्यक्ष वासुदेवराव चुटे, समन्वयक रमेश टेभरे, परेश उजवणे, व आंनद जांभुळकर, महिला काँग्रेसच्या प्रभादेवी उपराडे, शिला उईके, भुमेस्वरी रहांगडाले, वंदना काळे, किरण हटवार, मिनाताई राऊत, लताताई दोनोडे, राजु काळे, मलेश्याम येरोला, इजि. राजीव ठकरले, पप्पु ( राजकुमार )पटले, आशिष नागपुरे, ( एनएसयुआय ) उपाध्यक्ष अमन तिगाला , जाहिद सौलकी, अतिफ हबिव पठाण, देवचंद बिसेन, साहिल हुसैन राशीद कुरेशी, देवचंद ढेकवार, संजय दोनोडे, बळीराम काठेवार देवरी, निरज धमगाये, अफजल शेख, मिलींद गजभिये, नामदेव नाईक, अशोक मेंहर भुमेस्वरी मेंढे, देवराज खोटेले, अजय कुमार रहांगडाले, निलम हलमारे, अमर राहुल, सजंय मोहबे, प्रभाकर दहिकर, गोल्डी बोरकर, रविन्द्र चन्ने, श्याम देशमुख, लोकनायक रहागडाले, नरेन्द्र शेंन्डे, चंन्द्रकुमार बेंन्द्रे, गणेश हुकरे, हंसराज गजभिये, जगदिश चुटे, खलिद शेख, चंद्रशेखर बोपचे, मालीकचंद मेळे, महेश उके, नितेश शिवणकर, मंगेश चुटे, शुभम जैन, विजय कुंडे, निलाराम नाईक, त्रिभुवन शहारे, महेन्द्र धमगाये, रविकुमार क्षिरसागर इ. पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.

blank