40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ पीएम किसान सन्मान योजनेसाठी बँक खाते अद्यावत करा-तहसीलदार विनोद मेश्राम

पीएम किसान सन्मान योजनेसाठी बँक खाते अद्यावत करा-तहसीलदार विनोद मेश्राम

0
62

blank

अर्जुनी मोरगाव,- देना बँक आणि विजया बँकेचे बँक ऑफ बडोदा मध्ये शासनाने विलीनीकरण केले. देना बँकेमध्ये तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे बचत खाते होते. सदर बँक बडोदा बँकेत विलीन झाल्याने ग्राहकांचे बँकेखाते आणि आय.एफ.एस.सी.कोड बदलले.यामुळे संबंधित ग्राहकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले.पीएम किसान सन्मान निधीचे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित होते.बँकेचे अद्यावतीकरण झाले आहे.तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दवंडी देऊन प्रसार करावा.लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यावत बँक खाते आणि आधार कार्ड संबंधित ग्रामपंचायत मध्ये जमा करावे. शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधीचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार विनोद मेश्राम यांनी केले आहे.

blank