
कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे सिताफळ व जांभूळ प्रकल्पाला भेट
गडचिरोली, दि.24 : विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे यांनी दुर्गम भागातील कुरखेडा येथील
रामगड येथे महिला बचतगट द्वारे सुरू असलेल्या सिताफळ व जांभुळ प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी
स्थानिक महिलांशी संवाद साधून तयार होत असलेल्या विविध पदार्थांना नागपूर सारख्या शहरात बाजारपेठ मिळवूण
देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी रामगड संगिनी ग्रामसंघाद्वारे आयुक्तांना प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात
आली. तसेच पदार्थ निर्मिती, पॅकेजिंग, विक्री व फायदे तोटे समजून घेतले. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील महिला
अतिशय चांगल्या प्रकारे काम करून कुटुंबाला अर्थिक पाठबळ देत आहेत तसेच स्वत:च्या पायावर उभे राहून त्यांनी
सर्वांसमोर एक प्रकारचा आदर्शच निर्माण केला आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी
संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, उप विभागीय अधिकारी समाधान शेंडगे, महाराष्ट्र राज्य
जीवनोन्नती अभियानाच्या चेतना लाटकर उपस्थित होत्या.
यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी महिला बचतगट द्वारे तयार केलेल्या विविध पदार्थांचा
आस्वादही घेतला. बचत गटाने जांभूळ पल्प, सीताफळ, अंबाडी, मोहाचे लाडू, मध आदी विविध पदार्थ व फळ
प्रकियेची माहिती दिली. यावेळी महिला बचत गटाच्या सिताफळ व जांभुळ प्रकल्पाचे श्रीमती प्राजक्त लवंगारे यांनी
कौतुक करुन भविष्यात इतर ठिकाणीही महिला बचत गटाद्वारे असे विविध उपक्रम पाहवयास मिळतील अशी आशा
व्यक्त केली. त्याकरीता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया राबविणार असल्याचे त्या बोलल्या. महिला बचत
गटाद्वारे तयार केलेल्या उत्पादनाला नागपूर येथील नामांकीत कंपनीसोबत जोडून पदार्थांची विक्री केंद्र सुरु करता येईल
का याबाबतही माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना यावेळी केल्या.
गोगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी गोगांव येथील
फुलोरा क्षमता विकसन बालभवन प्रकल्प असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शोळेला भेट दिली. या ठिकाणी
आधुनिक तंत्रज्ञानासह विविध नाविण्यपुर्ण स्थानिक साहित्यामधून मुलांना शिक्षण दिले जाते त्याची माहिती त्यांनी
जाणून घेतली. सद्या कोरोना संसर्गामूळे विद्यार्थी शाळेत नव्हते. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले विविध
उपक्रम त्यांनी आयुक्तांना सादर केले. यावेळी आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी शिक्षण तेथील पद्धतीचे कौतुक केले व
उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. मुलांसाठी हसत खेळत मनोरंजनातून वेगवेगळया टुल्सचा वापर करून
चांगले शिक्षण देण्याचे कार्य या शाळेतून होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव, पंचायत समिती गडचिरोली येथे फुलोरा क्षमता विकसित
प्रकल्पाच्या संदर्भाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डायट गडचिरोली येथील प्राचार्य
शरदचंद्र पाटील, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनीत मत्ते , शिक्षणाधिकारी प्राथमिक हेमलता परसा यांनी भेट दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून फुलोरा क्षमता विकसित प्रकल्प जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव
या ठिकाणी सुरु आहे. या प्रकल्पाची पार्श्वभूमी, सादरीकरण, साहित्य निर्मिती व इतर माहिती भेटी दरम्यान देण्यात
आली. तद्वतच शाळेतील वर्चुअल क्लासरूमला सुद्धा मान्यवरांनी भेट दिली. वर्चुअल क्लासरूमचे सादरीकरण करण्यात
आले. सदर सादरीकरण शाळेतील शिक्षिका सुरेखा हलामी, शालू मेटे, व वनश्री जाधव यांनी केले. फुलोरा उपक्रमामुळे
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये झालेले सकारात्मक बदलाव सदर सादरीकरणात सांगण्यात आले. याप्रसंगी गट
शिक्षणाधिकारी यु. एन. राऊत, केंद्रप्रमुख बंडू खोबरागडे, शाळेचे मुख्याध्यापिका उज्वला खोबरागडे, शाळेतील शिक्षक
वृंद, विषय सहायक डॉ. विजय रामटेके, कुणाल कोवे व विठ्ठल होंडे उपस्थित होते. सदर भेटीदरम्यान तांत्रिक सहकार्य
श्री तपण सरकार विषय सहाय्यक यांनी केले.
****