31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक आनंदाची बातमी;जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची सुकन्या दिव्या गुंडे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

आनंदाची बातमी;जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची सुकन्या दिव्या गुंडे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

0
1942

blank

गोंदिया: गोंदिया जिल्ह्याची महिला जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे यांची सुकन्या कु. दिव्या गुंडे यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेली असून 338 वी Rank प्राप्त केलेली आहे. आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी सदर निकाल जाहीर करण्यात आला आहे.

दिव्या गुंडे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये “केंद्रीय लोकसेवा आयोग“ ची परीक्षा दिली. त्यानंतर 21 सप्टेंबर 2021 रोजी दिल्ली येथे त्यांची मुलाखत घेऊन आज रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाने परिणाम जाहीर केले. येत्या काही दिवसातच त्यांना “केंद्रीय लोकसेवा आयोग“ मार्फत पदस्थापना मिळणार आहे.blank

प्रशासकीय स्तरावर सदर बातमी मिळताच अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कु.दिव्या गुंडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळेस विश्वास शिरसाट उपविभागीय अधिकारी गोंदिया, तहसीलदार आदेश दफड, अपर तहसीलदार अनिल खळतकर, मुख्याधिकारी न.प. करण चव्हाण, आकाश चव्हाण, किशोर राठोड तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कु दिव्या गुंडे यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे श्रेय आई जिल्हाधिकारी नयना गुंडे व बाबा अर्जुन गुंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक यांना दिले आहे. तसेच सदर यश शिक्षक व मार्गदर्शक यांच्या मोलाच्या मार्गदर्शनातून मिळाले आहे, असे दिव्या गुंडे यावेळी म्हणाल्या. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया तर्फे तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कु. दिव्या गुंडे व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले आहे

blank