41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News काँग्रेस खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहे – सुखबीरसिंग बादल

काँग्रेस खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहे – सुखबीरसिंग बादल

0
21

blank

वृत्तसंस्था
चंदीगड, दि. २१ – काँग्रेस पार्टी खलिस्तानवादी दहशतवाद्यांना पाठिशी घालत असून काँग्रेसला राष्ट्रविरोधी पक्ष म्हणून घोषित करावे अशी मागणी पंजाबचे उपमुख्यमंत्री व शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधींना पंजाबमध्ये जुने दहशतवादी कारवायांचे काळे दिवस परत यावेत असे वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
खलिस्तानवादी गटाच्या सभांमध्ये काँग्रेसचे नेते उपस्थित होते आणि खलिस्तानचे झेंडे फडकावले गेले तेव्हाही ते तिथे होते एवढंच नव्हे तर खलिस्तानचा ठराव ज्या फुटीरतावाद्यांच्या सभेत मंजूर करण्यात आला तेव्हाही काँग्रेसचे नेत उपस्थित होते असा आरोप बादल यांनी केला आहे.

blank