सरपंच आणि मध्यस्थीला ४० हजाराची लाच स्वीकारताना अटक

0
9

नागपूर  दि. २१-सिमेंट रोडच्या बांधकामाचा चेक काढण्यासाठी मोहाडी ता. मौदा या गावातील सरपंच वनिता चकोले हिने तब्बल ५५ हजारांची लाच मागितली केली. ही रक्कम देण्याची संबंधिताची इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. कारवाई दरम्यान या महिला सरपंचाने रवींद्र चकोले याच्या मदतीने ४० हजार रुपये लाच स्वीकारली. ही लाच स्वीकारताना दोघानाही रंगेहात अटक करण्यात आली आहे.