
गोंदिया. शहरांमध्ये जलप्राधिकरण विभागा तर्फे गटार लाईन चे काम मागील एक ते दिड वर्षा पासून सुरू आहे. पण गटार लाईनचे काम ज्या प्रमाणे सुरू असायला पाहिजे त्या प्रमाणे हे काम सुरू नाही व जे सिमेंट क्राकिंट रस्ते चांगले होते ते रस्ते आपल्या गटाराच्या कामामुळे खराब झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी जमा होत आहे. व जी गटार लाईन खोदण्यात आली. पाईप टाकल्यावर ती गटार लाईन बुजवितांनी व्यवस्थित बुजविता येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अगोदर पेक्षा हि तो रस्ता आता अधिक खराब झालेला आहे व छोटा गोंदिया येथील शास्त्री चौक ते जनार्धन बनकर यांच्या घरा पर्यंत गटार लाईन ७ ते ८ महिने झाल्यावर सुध्दा त्या लाईन मध्ये क्रांकीट झाला नसल्यामुळे त्या रस्त्यावरुन रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या गटार कामात गती आणुन काम लवकर करण्यात यावे असे निवेदन देऊन चर्चा करतांना गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी सांगितले तसेच ज्या गतीने हे काम व्हायला पाहिजे त्या गतीने हे काम होत नसल्याचे संबंधित अधिकारी मा. पाटील साहेब यांनी ते मान्य हि केले. व मी स्वत: ज्या ठिकाणी अनियमितता दिसत आहे अशा ठिकाणी जाऊन बघणार अस त्यांनी सांगितले. मनसेचे उपशहर अध्यक्ष क्षितिज वैद्य म्हणाले कि, आमच्या प्रभाग क्रमांक ६ मधील गांधी वार्ड मध्ये मागील वर्षी या योजनेचा कामात फक्त रस्त्याचे व नालीचे काम करण्यात आले ते हि धळ नाही वरुन गटार लाईन खोदण्यातच आलेली नाही नुसती लुट करण्यात आलेली आहे हे काम होणार केव्हा ? अशा सवाल केला. तेव्हा जल प्राधिकरण उप अभियंता पाटील साहेब म्हणाले, याच्यात आमचा काही हि दोष नाही काही अडचणी मुळे या कामात अडथळा निर्माण झाला पण या पुढे असं होणार नाही आणि लवकरच आम्ही त्या भागात पाहणी करून, कामाला सुरुवात करु असा आश्वासन दिला. या संबंधित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उप अभियंता जल प्राधिकरण विभाग यांना निवेदन देतांनी मनसेचे गोंदिया तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, उपशहर अध्यक्ष क्षितिज वैद्य, शहर उपाध्यक्ष रजत बागडे, मनविसे शहर उपाध्यक्ष निखिल गडपायले, शहर प्रसिद्धी प्रमुख कृष्णा ढोंगे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..





