
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार प्रफुल पटेल यांच्या वडसा आगमनाची जय्यत तैयारी
वडसा/देसाईगंज,दि.09ः- येथील सिंधू सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार प्रफुल पटेल यांच्या 18 नोव्हेबरला वडसा आगमनाच्या निमित्ताने आयोजित करुन आढावा घेण्यात आला.या नियोजन सभेला माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्यासह भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिलभाऊ फुंडे,निरिक्षक श्रीकांत शिवणकर,जगदीश पंचबुद्धे,वसंतराव ठाकरे,युनूस शेख, गंगाधर परशुरामकर,नानाभाऊ नाकाडे,बालूभाऊ चुंने,कृपाल मेश्राम,शरद सोनकुसरे,संदीप ठाकुर,अमिनभाई लालाणी,लतिफ शेख,राकेश राऊत,वणामाला पुस्तोडे,दृपदी सुखदेवे,पुष्पा सुरकर,राम लांजेवार, संजय साळवे, प्रदीप हजारे, सुनील नंदनवार, प्रल्हाद वघारे, पठाण सर, अंबादास कांबळी, मनोज ढोरे, योगेश नांडगाये, हेमू परशुरामकर, कृष्णा आंबेकर, अविनाश हुमने, कपिल बागडे, सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.





