
गोरेगांव,दि.11- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मार्गदर्शनानुसार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुका काँग्रेस कार्यकारीणीचे पुर्नगठन करुन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.तालुकाध्यक्ष पदावर डेमेंद्र रहागंडाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका काँग्रेस कमेटी विस्तारीत कार्यकारीणीचे गठन प्रदेश काँग्रेसचे महासचिव नामदेवराव कीरसान,प्रदेश सचिव पी.जी.कटरे,अमर वर्हाळे, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष झामसींग बघेले,महासचिव जगदिश येरोला यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यात अध्यक्ष 1, उपाध्यक्ष 6,सचिव 16,कोषाध्यक्ष,महासचिव 13,सहसचिव 17,संगठन सचिव 15,प्रसिध्दी प्रमुख 10,महिला प्रतिनिधी 16,आमंत्रित सदस्य 15,फ्रंटल तालुका अध्यक्ष 10 आदींचा समावेश आहे.





