34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय विजय शिवणकरांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

विजय शिवणकरांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

0
404

blank

गोंदिया,दि.16ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांनी आज(दि.16)आपल्या समर्थकासंह मुबंई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.मुबंई येथे पोचल्यावर विजय शिवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,खासदार प्रफुल पटेल यांना आपला राजीनामा(दि.15) पाठविला होता.त्यानंतरपासून ते भाजपमध्ये जाणार हे निश्चित झाले होते.त्यानुसार आज मंगळवारला मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीत त्यांनी उपस्थित होऊन पक्ष प्रवेश केला.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार,खासदार सुनिल मेंढे, आमदार डाॅ.परीणय फुके,माजी मंत्री इजिं.राजकुमार बडोले, गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्ष केशवराव मानकर,माजी आमदार भैरसिंह नागपूरे यांच्यासह भंडारा गोंदिया जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवणकर ङ्मांच्ङ्मासह बाबुलाल दोनोडे, वसंत पुराम, तुकाराम बोहरे, रामेश्वर पंधरे, अजय बिसेन, नरेंद्र शिवणकर, केशवराव भुते, भास्कर धरमशहारे, जलाल पठाण, घनश्याम कटरे, बबलू डोये आदींचा समावेश आहे.blank

blank