41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ बिएलओ महिला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

बिएलओ महिला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

0
31

blank

सुकडी क्षेत्राचे राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व बावनथडेंच्या नेतृत्वात दिले निवेदन

तिरोडा,दि.17: तिरोडा तालुक्यातील बिएलओ(BLO) महिला कर्मचाऱ्यांचे मागील २ वर्षापासूनचे प्रलबिंत असलेले मानधन न मिळाल्याने या अन्याग्रस्त महिला कर्मचार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जगदीश बावनथडे़ यांच्याकडे धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.त्यावर जगदीश बावनथडे़ यांनी तालुक्यातील सर्व बीएलओ महिला कर्मचार्यांना एकत्रित करुन त्यांच्या समस्यांचे निवेदन तयार करुन तहसिलदारांना निवेदन सादर केले.बावनथडे यांच्या या पुढाकारानंतर तहसिलदार यांनी 8 दिवसात सदर प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन निवेदन देतांना बावनथडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले.

यावेळी सौ.सरीता हट्टेवार, अश्विनी हट्टेवार, कल्पना कटरे, दर्शना बोरकर, मंदा बारेवार, पुष्पलता पटले, शिशुकला बावनकुळे, शोभा रहांगडाले, भुमेश्वरी कटरे, रेखा भैरम, इंदु बिसेन, सिमा कोटांगले, हेमलता झगेकार, माला चौधरी, भुमेश्वरी गौतम, उषा टेंभरे, प्रमिला उइके, मंदा वास्निक, शालु बहेकर, कल्पना चौधरी, निता शेंडे, दिशा बिसेन, आशा कोकुडे, मंगला सपाटे, संगिता पारधी, शारदा कटरे, सुरेखा पारधी, कुंदलता आगासे, उषा परिहार, रजनी नागदेवे, हेमलता उदापुरे, उषा पटले, पुष्पलता पटले उपस्थित होत्या.

blank