38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय भाजप नेते डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

भाजप नेते डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

0
61

blank

नागपूर : २२ नोव्हेंबर –नागपुरात विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देत अर्ज भरण्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं असता दुसरीकडे भाजपा नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

भाजपा नेते आणि आरएसएसचे स्वयंसेवक राहिलेले नगरसेवक छोटू भोयर यांनी सोमवारी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. छोटू भोयर मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नामांकन अर्ज भरणार आहेत. छोटू भोयर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. भोयर यांचा काँग्रेस प्रवेश भाजपच्या पराभवाचे संकेत असल्याचं पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत.छोटू भोयर यांनी यावेळी जितकी मते भाजपाकडे अधिक आहेत तेवढ्याच मतांनी त्यांचा उमेदवार पराभूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. “निवडणूक लढवणार नाही असं बावनकुळे म्हणाले होते. पण ते कार्यकर्त्यांशी खोटे बोलत होते. त्यांनी तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले. ज्या कारणांसाठी त्यांना विधानसभेत तिकीट नाकारले ती कारणे संपली का हे भाजपाने जाहीर करावे,” अशी मागणी छोटू भोयर यांनी यावेळी केली. दरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर छोटू भोयर नितीन राऊत यांच्या कारमधून रवाना झालेblank

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल;नितीन गडकरी, फडणवीस उपस्थिती
नागपूर- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागपूर मतदारसंघासाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, बरिएमंच्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे व भाजपाचे सर्व आमदार उपस्थित होते. अर्ज भरण्यासाठी निवडणूक प्रमुख आ. प्रवीण दटके आणि सहनिवडणूक प्रमुख डॉ. राजीव पोतदार खा. डॉ. विकास महात्मे, माजी खा. अजय संचेती, जिल्हाध्यक्ष अरqवद गजभिये, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. समीर मेघे, आ. गिरीश व्यास, महापौर दयाशंकर तिवारी, आ. मोहन मते, माजी आ. सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, संदीप जोशी, वीरेंद्र कुकरेजा, चरणqसग ठाकूर, महानगर पालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगर पालिकांचे नगरसेवक, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद घेतला. गडकरी यांच्या निवासस्थानी कांचन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्योती बावनकुळे, संकेत, पायल आष्टनकर व लोकेश आष्टनकर उपस्थित होते.

blank