
लाखांदूर,दि.02ः- लाखांदूर येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी बिडीसीसी बँक भंडाराचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, तालुका निरीक्षक विजयभाऊ सावरबांधे, तालुकाध्यक्ष बालू चुन्हे, शहर अध्यक्ष अँड. मोहन राऊत, नरेशभाऊ दिवटे, शंकरभाऊ खराबे, शहर निरीक्षक प्रमोद प्रधान, श्रीकांत रणदिवे, योगेश ब्राह्मणकर, देवानंद नागदेवे, राकेश राऊत, अतुल परशुरामकर, मंगेश ब्राह्मणकर, बबन पिलारे, सुरेश देव्हारे, सुधोधन टेम्बुरने, कैलाश रामटेके, जीवन मेश्राम, सुभाष दिवटे, राजेश्वर ठाकरे, रामकृष्ण ठाकरे, डॉक्टर विजय फुंडे, संतोष गोंधळे, संजय नाहले, कल्पना जाधव, सुनीता बिसेन, गीता लंजे, वंदना गाकरे, सुहानी नाहले, वैशाली बनकर, रजनीकांत खंडारे, उपस्थित होते. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून प्रभाग 15 मधून संतोष रामदास घोरमोडे यांच्या सहकार्याने चिंचोली व अतुल परशुरामकर पिंपळगाव/को. यांच्या सहकार्याने शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजेन्द्र जैन व उपस्थित मान्यवर यांनी सर्व प्रवेशितांचे पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा वापरुन स्वागत केले याप्रसंगी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.





